लॉकडाउनमध्ये घरबसल्या बँकेतून मागवा पैसे

ई ग्राम : कोरोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे. या हालाकीच्या परिस्थितीमध्ये तुमच्या जवळील रोकड संपण्याची शक्यता आहे. अशामध्ये कोणत्या कामासाठी तुम्हाला पैशांची चणचण भासत असल्यास घाबरून जाऊ नका. या परिस्थितीमध्ये तुम्ही घरबसल्या बँकेकडून पैसे मागवू शकता. एसबीआय, आयसीआयसीआय, एक्सिस आणि कोटक सारख्या मोठ्या बँकांनी ग्राहकांसाठी ही सुविधा उपलबद्ध केली आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटनुसार, घरी पैसे मागवायचे असल्यास तुम्हाला बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर Bank@homeservice लॉगइन करावं लागेल. त्याशिवाय बँकेच्या ग्राहक सेवांवर क्रमांकावर (कस्टमरकेअर) फोनही करू शकता. बँकेकडून रोकड मागण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंतच ही सेवा उपलब्ध असणार आहे. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये बँकेचे प्रतिनिधी तुम्हाला पैसे पोहच करतील. दोन हजार रूपयांपासून दोन लाख रूपयांपर्यंत तुम्ही पैशांची मागणी करू शकता. या प्रक्रियेसाठी तुम्हाला एकरकमी शुल्क ५० रूपये आणि १८ टक्क्यांचं सेवा शुल्क असं ६० रूपये भरावे लागतील.

तब्बल ४० कोटीं ग्राहक असणारी एसबीआय डोरस्टेप डिलव्हरी या सुविधेच्या अंतर्गत घरपोच पैसे आणि घरीच पैसे जमा करण्याची सुविधा देतेय. एसबीआयची ही सुविधा फक्त ज्येष्ट नागरिक आणि दिव्यांग ग्राहकांसाठी आहे. या सुविधेचं शुल्क १०० रुपये आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक एचडीएफसीही ग्राहकांना घरपोच पैशांची सेवा देतेय. पाच हजार रूपयांपासून २५ हजारांपर्यतची नगद ग्राहक घरपोच मागवू शकते. त्यासाठी १०० रूपयांपासून २०० रुपयांपर्यतच शुल्क संबंधित बँकेकडून आकारलं जाते. कोटक, एक्सिस आणि इतर बँकमार्फतही अशाच नियमांनुसार घरपोच पैशांची सेवा दिली जाते. संबधित बँकेचं संकेतस्थळ किंवा अॅपवर या सुविधेची सर्व माहिती उपलबद्ध आहे.

जर तुमच्या बँक खात्यावर पुरेसे पैसे नाहीत आणि तुम्हाला गरज असल्यास घाबरण्याचं कारण नाही. बँकेकडून तुम्हाला तात्काळ कर्जाची सुविधाही मिळतेय. सध्याच्या परिस्थितीमध्ये काहींच्या हाताला काम नसल्यामुळे आर्थिक चणचण जाणवत असल्यास या सुविधेचा लाभ घेता येईल. मनीटॅपचे कुणाल वर्मा यांच्यानुसार, बँकेच्या अॅपमध्ये केवायसी पुर्ण करून अवघ्या १२ ते २४ तासांत कर्ज घेता येतं. कर्जाची रकम तुमच्या बँक खात्यात सरळ जमा होते. तुम्ही ती रक्कम घरबसल्या बँकेकडून मागवू शकता.

Read Previous

महापालिका नागरिकांना देणार घरपोच जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला

Read Next

अवकाळी पावसाने बळीराजावर नवीन संकट