कोरोनामुळे पाम तेलाच्या आयातीत १४ टक्के घट

Smiley face < 1 min

नवी दिल्ली – भारताने ऑगस्ट महिन्यात ७ लाख ३४ हजार टन इतके पाम तेल आयात केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाम तेलाच्या आयातीत १३.९ टक्के घट झाली आहे. कोरोनामुळे हॉटेल आणि रेस्टोरंटमध्ये अजून ग्राहकांची वर्दळ पूर्ववत झाली नसल्याने आयातीत घट झाली आहे.

गेल्या महिन्यातील सोयाबीन तेलाची आयात ३ लाख ९४ हजार टन झाली असून यात १०.४ टक्के घट झाली आहे. तसेच सूर्यफूल तेलाची आयात १ लाख ५८ हजार टन झाली असून यामध्ये ३१टक्के घट झाली आहे, अशी माहिती सॉलव्हंट एक्स्ट्राक्टर असोसिएशनने दिली आहे. सगळे खाद्य तेल मिळून भारतात ऑगस्ट महिन्यामध्ये १३.७ लाख टन आयात झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत आयातीत १४ टक्के घट झाली आहे.

वाचा:  भारताच्या कांद्यामुळे बांगलादेशच्या डोळ्यात पाणी; केली 'ही' मागणी

भारत खाद्य तेल आयात करणारा मोठा देश आहे. देशातील तेल बियाण्यांच्या उत्पादनाच्या अंदाजाचा परिणाम पाम तसेच इतर खाद्य तेलाच्या अयातीवर होतो. सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तरी नुकसानीचे नेमके किती प्रमाण आहे याचा नक्की अंदाज आलेला नाही. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन अर्थात सोपाने दिलेल्या अंदाजानुसार सोयाबीनचे १२ ते १५ टक्के नुकसान झाले आहे. तरी काही भागात यापेक्षा नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या अनिश्चिततेमुळे सोयाबीनच्या भावातही भरपूर चढउतार झाले आहेत.

वाचा:  राज्यात पावसाचा जोर कमी होणार; पण...

भारतातून खाद्य तेलाची आयात घटली असल्यास मलेशियामधील पाम तेलाच्या आणि अमेरिकेतील सोयाबीन तेलाच्या किमतीवर परिमाण होतो. पाम तेलाची सर्वाधिक मागणी हॉटेल्सकडून असते. जूनमध्ये टाळेबंदी उठल्यानंतर काही प्रमाणात पाम तेल आयात वाढली होती. परंतू ऑगस्टमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पाम तेलाची विक्री कमी झाली असल्याची शक्यता आहे. इंडोनेशिया आणि मलेशियामधून प्रामुख्याने भारतात पाम तेल आयात केले जाते आणि इतर खाद्य तेल अर्जेंटिना, यूक्रेन, ब्राझील आणि रशियामधून आयात केले जाते.

वाचा:  महामहीम राज्यपाल नागरिकांच्या हक्कांप्रति संवेदनशील; रोहित पवारांचा खोचक टोला

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App