कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्रीस परवानगी, पण…

Smiley face < 1 min

नंदुरबार : कोविड १९ मुळे उद्‍भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात १ ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीत लागू केलेल्या संचारबंदीदरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी-विक्री व्यवहारास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी परवानगी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, मिरची, भाजीपाला (नाशवंत) खरेदी-विक्री करण्यासाठी बाजार समिती पहाटे पाच ते ११ या कालावधीत सुरू ठेवण्यात याव्यात. सकाळी अकरानंतर कुठलीही कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू राहणार नाही.

egram
वाचा:  खत टंचाईमुळे केंद्र सरकारच्या अनुदानात वाढ होण्याची शक्यता

शेतीविषयक दुकाने, बी-बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीविषयक अवजारे, पशुखाद्य, कृषी साहित्याची दुरुस्ती, विक्री इत्यादी आस्थापना सकाळी सात ते ११ या कालावधीत सुरू राहील.

जिल्हा सीमा, जिल्ह्यातील चेक पोस्टवर शेतीसंबंधित धान्य माल विक्री वाहतूक करणाऱ्या वाहनांना तपासणीतून सूट राहील. शेती मालाबाबत कोणीही अफवा पसरवून शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक करताना आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. संबंधित आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

वाचा:  खत टंचाईमुळे शेतकऱ्यांची कोंडी; शेतकऱ्यांना मोठा फटका
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App