राज्यात ‘या’ दिवसापासून ‘अवकाळी’ची शक्यता; हवामानात प्रचंड बदल

Smiley face < 1 min

पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली आहे. उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडतील. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

उत्तर कर्नाटक ते मध्य प्रदेशाचा आग्नेय भाग व महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. या क्षेत्राची आज आणि उद्या आणखी तीव्रता वाढून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. त्यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडेल. काही ठिकाणी अंशतः हवामान राहणार असून, राज्यातील उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा आणखी वाढणार आहे.

egram

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यातच पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला झाल्याने वातावरणात वेगाने बदल होऊ लागले आहेत. रात्रीची थंडी कमी होत असली तरी पहाटे काही प्रमाणात गारठा असतो, तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता.१६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ३९.९ अंश सेल्सिअसची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. येत्या काळात पूर्वमोसमी पावसाबरोबर उन्हाचा चटका वाढणार असल्याने कमाल तापमानात वाढ होणार आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App