पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार

Smiley face < 1 min

पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर आराखडा तयार करून जिल्हा परिषदेकडून निश्चित करण्यात आलेल्या ४०६ पर्यटन स्थळांचा अभ्यास करा, तिथे कोणकोणत्या सुविधा उभा करता येतील यावर विचार करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.१९) पुणे जिल्हा पर्यटन विकास आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार ॲड. अशोक पवार, संजय जगताप, सुनील टिंगरे, सुनील शेळके, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, दिलीप मोहिते, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वाचा:  पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु

या वेळी मंत्री पवार म्हणाले, ‘‘पर्यटन विकासासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कार्यशाळा घेऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. खासदार सुप्रिया सुळे आणि ॲड. वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू होणारा हा प्रकल्प स्तुत्य असून, त्या बाबतीत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. परंतु काम लोकांच्या सुविधेत भर पाडणारे व दर्जेदार असावे.”

वाचा:  आभाळं फाटलं, डोंगर तुटले; खेड, साताऱ्यात मोठी दुर्घटना

“जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था असावी. तसेच पर्यटनाच्या ठिकाणी चुकीचे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. जुन्नर तालुक्याप्रमाणे अन्य तालुके पर्यटनस्थळे घोषित होण्याबाबत प्रयत्न करावेत.’’

या वेळी जिल्ह्यातील ४०६ पर्यटन स्थळांच्या जमिनीची मालकी व कार्यरत मनुष्यबळ, लोणावळा येथील नियोजित नावीन्यपूर्ण पर्यटन उपक्रम, पिंपरी-चिंचवडमधील पर्यटन स्थळे, किल्ले सिंहगड विकास, भीमाशंकर येथील अतिक्रमण धारकांसाठी अल्पोपहार केंद्र उभारणी, अतिक्रमण धारकांसाठी केलेली प्रस्तावित उपाययोजना, पुरातत्त्व विभाग, जिल्ह्यातील विशेष पर्यटन क्षेत्र, महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन विकास, कृषी पर्यटन, पर्यटनातून रोजगार निर्मिती, गड किल्ले पर्यटन विकास आदींबाबत आढावा घेण्यात आला.

वाचा:  अखेर उजनी धरण प्लसमध्ये; जाणून घ्या टक्केवारी

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App