ई ग्राम टीम – मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० पेक्षा वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. सध्या ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे.
राज्यभर कोरोनाचा कहर सुरू असताना त्यात महागाईची भर पडल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. भाजीपाल्यासह डाळींचा तुटवडा निर्माण झाला असून जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हिरवा वाटाणा १६० ते १८० रुपये प्रतिकिलो व शेवगा शेंगासह फरसबी ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
हरभऱ्याच्या डाळींनंतर देशातील सर्वाधिक खप असलेल्या तुरीच्या डाळींचा भावही गगनाला भिडला आहे. मुख्य बाजारात आवक कमी झाल्याने किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. यामुळे घाऊक दर हा १०० रुपये प्रति किलो पेक्षा जास्त झाला आहे. तर किरकोळ दर हा १५० रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला आहे.
येत्या काही दिवसात ही परिस्थिती बदलली नाही तर किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान अनेक व्यापाऱ्यांनी तुर डाळ आयात करु द्यावी यासाठी परवान्यांची मागणी केली आहे. परंतु सरकारकडू अजून काही कार्यवाही झालेली नाही. तुर डाळीची किमत मंगळवारी ११५ रुपये प्रति किलो होती.
ऑल इंडिया डाळ असोशिएशनचे अध्यक्ष सुरे अग्रवाल यांनी माध्यामांना सांगितले की, मागील पंधरवाड्यात तूर डाळीची किंमत ही २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तूर बाजारात येईल. तूर डाळीची मागणी साधरण ३ लाख टन असते. यामुळे नवीन उत्पन्न येईपर्यंत साधरण ९ लाख टन तुरीची आवश्यकता आहे.
दरम्यान डाळ मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल म्हणतात की, आवक कमी झाल्याने किंमती वाढतील अशी माहिती आपण शासनाला आधीच दिली आहे. अनेक वेळा आयात करण्यासाठी परवाने दिले जावे यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. सरकारने या वर्षात ४ लाख टन तूर आयात करण्याचा मानस ठेवला आहे. पण आयातीसाठी परवाने अजून देण्यात आलेले नाहीत.
महागाईची कारणे
राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये जीवनाश्यक वस्तूंची आवक घटली आहे. डाळींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. देशात पुरेसा साठा नाही व आयातही पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे डाळींचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागेल आहेत. सप्टेंबर अखेरीस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याचा परिणाम उत्पादनावर झाला असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. यामुळे बाजारभाव झपाट्याने वाढू लागले आहेत.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.