टोमॅटोच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे केले जावेत

Smiley face < 1 min

ई ग्राम : मागच्या काही दिवसात टोमॅटोवर पसरलेल्या संसर्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जावी. असे मत किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले. नवले यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी टोमॅटोवरील विषाणू संसर्ग : काही अनुत्तरीत प्रश्न या विषयावर मार्गदर्शन केले.

वाचा:  ‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने कार्यवाही करा’

यावेळी बोलताना ते म्हणाले समाजमाध्यमातून पसरलेल्या काही अफवांमुळे टोमॅटो पिकाबद्दल मोठी नकारात्मकता निर्माण झाली होती, पण सर्वांच्या प्रयत्नातून आपण यातून बाहेर पडलो. तरीही यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. टोमॅटोवर पसरलेल्या या संसर्गाचे साथीमध्ये रुपांतर कसे झाले ? असा प्रश्न विचारत भविष्यात अश्या साठी रोखण्यासाठी कृषी विभागाकडून योग्य ती काळजी घेतली जावी. असे आवाहन नवले यांनी यावेळी केले.

वाचा:  राज्यात उन्हाचा पारा वाढू लागला; हवामान खात्याची माहिती

27 मे
नरेंद्र पवार
अध्यक्ष, स्वामी समर्थ उत्पादक शेतकरी कंपनी
विषय : शेतकरी कंपन्या आणि शेतमाल पुरवठा व्यवस्था

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App