भाजपाला पुन्हा धक्का! नांदेड जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा

Smiley face < 1 min

नांदेड : राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निकाल हाती आले आहेत. यात कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या महाविकास आघाडीने १७ जागेवर यश मिळवत बँकेवर दणदणीत वर्चस्व मिळवले आहे. तर विरोधी भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

नांदेड जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. २१ संचालकांपैकी तीन जागा आधीच बिनविरोध निवडून आल्याने १८ जागांसाठी शुक्रवारी (ता.२) मतदान झाले होते. आज रविवारी (ता.४) मतमोजणी झाली. सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीच्या पॅनलला यश मिळत होते. यामध्ये कॉग्रेस- १२, शिवसेना- १, राष्ट्रवादी-४ तर भाजपच्या पॅनलला- ४ जागेवर विजय मिळाला आहे. यापैकी कॉग्रेसचे बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर तर भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर हे बिनविरोध निवडणून आले आहेत.

egram

जिल्हा बॅंकेवर पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणजेच महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. गेल्यावेळी भाजपने कॉग्रेसला एकाकी पाडत जिल्हा बॅंकेची सत्ता मिळवली होती. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना अशोक चव्हाण यांनी जिल्हा बॅंकेत परिवर्तन घडवल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. जिल्हा बॅंकेत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा मिळवत भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धोबीपछाड दिला आहे.

माजी मंत्री पराभूत
माजी मंत्री गंगाधर कुंटूरकर यांचा नायगाव सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून पराभव झाला. कुंटुरकर यांचे कालच निधन झाले. रविवारी झालेल्या मतमोजणीत त्यांचा माजी आमदार वसंत चव्हाण यांनी २८ विरुद्ध २२ मतांनी पराभव केला आहे.

“नांदेड जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत २१ पैकी १७ जागांवर कौल देत मतदारांनी महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या या बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व नवनिर्वाचित संचालक प्रयत्नशील राहतील, याची मला खात्री आहे.”
अशोक चव्हाण, पालकमंत्रीनांदेड.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App