अमेरिकेतली लाखो डॉलर्सची नोकरी सोडून ‘तो’ करतोय मक्याची शेती

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – परदेशात जावून मोठ्या पगाराची नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. भारतातून एखादी व्यक्ती नोकरीसाठी परदेशात गेली तर पुन्हा मायदेशात येण्याचे नाव घेत नाही. मात्र, अमेरिकेतील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणाने चक्क शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तरुण मायदेशात येवून आपल्या गावात मक्याची शेती करत आहे. सतिश कुमार असे या तरूणाचे नाव आहे. सतिश हा कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील शेलागी गावाचा रहिवासी आहे. या तरूणाने गावाकडे येऊन शेती करण्याची इच्छा असल्यामुळे अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडली आहे.

वाचा:  अखेर पीकविम्याचा प्रश्न सुटला; आज जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम

सतीश यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, मी लॉस एंजेलीस, युनायटेड स्टेट्स आणि दुबईमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होतो. अमेरिकेत मला एका वर्षाला १ लाख अमेरिकन डॉलर्स मिळत होते. पण ते काम करण्यातून मला मानसिक समाधान आणि आनंदही मिळत नव्हता. त्याशिवाय मला माझ्या आयुष्यात जे कारायचे होते, त्यासाठी वेळच मिळत नव्हता. त्यामुळे मी नोकरी आणि अमेरिका सोडून पुन्हा गावी परतण्याच निर्णय घेतला, असे सतिश यांनी सांगितले.

वाचा:  कृषी विधेयकाविरोधात ३१ शेतकरी संघटनांनी पुकारला बंद

सतिश पुढे म्हणाले की, मी २ वर्षांपूर्वी शेती सुरू केली. मागच्या महिन्यात मला २ एकर जमिनीत केलेल्या शेतीतून अडीच लाक रुपये उक्पन्न मिळाले. मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावी परतण्याचे धाडस सतिश यांनी दाखवले. मक्याची शेती करण्यासाठी सतीश हे आपल्या कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील मूळ गावी परतले. शेतीतून मिळत असलेल्या उत्पन्नात सतिश समाधानी आणि आनंदी आहेत.

वाचा:  या उपक्रमामुळे 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला फायदा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App