हातकणंगलेत रब्बी क्षेत्र पाच टक्क्यांनी वाढवणार; तालुका कृषी विभागाचे उद्दिष्ट

Smiley face < 1 min

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : चालू वर्षातील पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे हातकणंगले तालुक्यातील नदी, नाले, तलाव, विहिरीत पाण्याच्या पातळीत स्थिरता आली आहे. पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान झाले. तरीही याच पावसामुळे हातकणंगले तालुक्यातील रब्बी हंगामाला हातभार लागेल. कृषी विभागाने यंदाच्या हंगामात सरासरी ६ हजार ३३ हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले. १८.२१ टक्क्यांनी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी तालुका कृषी विभागाने प्रत्येक गावात ५ टक्के रब्बीचे क्षेत्र वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

वाचा:  देशात सोयापेंडीचे पुरेसे उत्पादन असल्याने आयातीची गरज नाही : सोपा

गतवर्षी रब्बी गहू, रब्बी ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला अशी इतर पिके मिळून ४ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची लागवड केली होती. या वर्षी रब्बी ज्वारी या मुख्य पिकासह तालुक्यात ६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे नियोजन आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मुबलक आहे.

egram

मका पिकाखालील क्षेत्रात या वर्षी विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. हे प्रमाण तब्बल १८ हेक्टरवरून ३५० हेक्टरवर जाऊ शकेल. गावोगावी कृषी खात्याने यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात यंदा ज्वारीचे प्रमाण तब्बल ११.५२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

वाचा:  पावसामुळे गळीत हंगामात अडथळे; ऊसमजुरांची कामे खोळंबली

रब्बीसाठी ३०० हेक्टरवर प्रात्यक्षिक क्षेत्र निश्‍चित
रब्बी हंगामासाठी तालुका कृषी विभागाने ३०० हेक्टरवर प्रात्यक्षिक क्षेत्र निश्‍चित केले आहे. ज्वारी आणि हरभरा ही प्रमुख पिके यामध्ये घेतली जातील. यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले. यासाठी ८०० लाभार्थी निवडले. प्रात्यक्षिक क्षेत्रात फुले रेवती जातीची ज्वारी, हरभरा यांचे उत्पादन घेतले जाईल.

वाचा:  कोल्हापूर उत्तर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App