पुणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचा शिडकावा

Smiley face < 1 min

पुणे : पुणे जिल्हयाच्या बहुतांशी भागात पावसाचा शिडकावा झाला. या पावसाने खरिपातील पिकांना दिलासा मिळत असला तरी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंत इंदापुरात २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यासह पूर्व भागात पावसास चांगलीच सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. सध्या भात लागवडीसाठी जोरदार पावसाची गरज असून अनेक ठिकाणी भात लागवडी खोळंबल्या आहेत.

वाचा:  बोगस बियाणे पुरवठा कंपन्यांवर कारवाईचा ठराव

हवेलीतील केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरूळीकांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली, मुळशीतील पौड, घोटावडे, थेरगाव, माले, मुठे, पिरंगुठ, भोर तालुक्यातील भोळावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबावडे, संगमनेर, निगुडघर परिसरात पावसाचा शिडकावा झाला.

दरम्यान, मावळ तालुक्यातील काले येथे १३.५, लोणावळा परिसरात १४.८ मिलिमीटर पाऊस पडला. बारामतीतील माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी येथेही पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. इंदापूरातील लोणी येथे १६.०, बावडा येथे १५.५, काटी येथे १५.३, निमगाव येथे १५.३, अंथुर्णे येथे ६.५, सणसर येथे १०.८ मिलिमीटर तर दौंडमधील देऊळगाव येथे १८.८ मिलिमीटर पाऊस झाला.

वाचा:  भावांनो आता बहिणीचा हक्कसोड विसरा; वडिलांच्या संपत्तीवर समान वाटा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App