राज्याच्या ‘या’ भागात पुढील 24 तासांत वाढणार पावसाचा जोर

Smiley face < 1 min

मुंबई : राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रीय होण्यास पोषक हवामान तयार झाले झाले आहे. मुंबईत आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. तसेच येत्या पुढील 24 तासांत मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. असा अंदाज कुलाबा हवामान खात्याने दिला आहे.   

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, पुणे, सातारा भागात पुढील 24 तासांत काही भागात मुसळधार पाऊस होईल. यंदा राज्यात मॉन्सून वेळेवर आगम केले आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा मॉन्सून सक्रीय होण्यास सुरूवात झाली आहे.

वाचा:  ऐकावे ते नवलचं...! म्हशीला झालं जुळं

पुण्यात गेल्या 8 दिवसांपासून सुरू होत असलेल्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, खडकवासला धरणसाखळीतली चारही धरण भरलेली असल्यामुळे मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे, कोकणात पावसाचा जोर वाढला आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज पहाटेपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. तसेच जोराच्या सोसाट्यांच्या वाऱ्यांसह मुंबई शहारात आणि उपनगरात पाऊस कोसळत आहे.

वाचा:  टिकटॉकच्या खरेदीसाठी 'या' दोन कंपन्यांमध्ये चुरस

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App