कोकणात पावसाची उसंत

Smiley face < 1 min

पुणे : कोकणात जवळपास आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रविवारपासून जोर ओसरला आहे. सोमवारी (ता.२१) कोकणसह मध्य महाराष्ट्रातील पावसाने चांगलीच उसंत दिली आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे नद्यांतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. वाढलेल्या पाणीपातळीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. खानदेश, मराठवाडा व विदर्भात दिवसभर ऊन्हासह काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते.

तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस :
राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकणातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. सुरूवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या आठवड्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर जिल्हयातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.

वाचा:  सरकार पाडण्यासाठी कर्नाटकात ‘पेगॅसस’चा वापर?

घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळत होता. काही ठिकाणी पावसामुळे दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, नद्या खळाळून वाहत असल्याने सिंधुदूर्ग, रायगड, रत्नागिरीमधील बहुतांशी लहान व मध्यम प्रकल्प भरून वाहू वाहत होते. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. श्रीवर्धन येथे सर्वाधिक ६६ मिलिमीटर पाऊस पडला असून काही ठिकाणी हलक्या सरी बरसत होत्या.

वाचा:  पावसाअभावी दीड लाख हेक्‍टरवरील लावणी खोळंबली

मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी :
गेल्या दोन ते तीन दिवसापासून मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक भागात पावसाने उघडीप दिली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत. कोल्हापूरातील राधानगरी, साताऱ्यातील महाबळेश्वर, नाशिकमधील ओझरखेडा, पुण्यातील लोणावळा, वेल्हे येथे मध्यम

वाचा:  इंधनावर राज्यांकडून ‘इतक्या’ टक्क्यांपर्यंत ‘व्हॅट’

पाऊस पडला. तर पुणे शहर, नगरमधील अकोले तालुक्यात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. यामुळे भात रोपांना दिलासा मिळत असून भात रोपे चांगलीच तरारली आहेत.

दरम्यान, येत्या काळातही असाच पाऊस झाल्यास भात रोपांची वेळेवर लागवड होण्याची शक्यता आहे. पूर्व भागात पाऊस नसला तरी काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. मराठवाडा व विदर्भात पावसाची अजूनही प्रतिक्षा आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App