‘जगातील बाजारपेठेत बेदाणा आणि हळदीचे ब्रँडिंग करावे’

Smiley face < 1 min

सांगली : देशातील प्रत्येक राज्यात आता भौगोलिक मानांकन केलेल्या शेतीमालाची विक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे सांगलीतील मिळालेल्या बेदाणा आणि हळद या दोन पिकांना याचा विक्रीसाठी मोठा फायदा होईल. सहाजिकच उत्पन्नात वाढ होईल. सध्या दर्जेदार उत्पादन घेण्यात आता शेतकरी पारंगत झाला आहे. आता जगातील बाजारपेठेत बेदाणा आणि हळदीचे ब्रॅडिंग करून विक्रीसाठी पुढे आले पाहिजे, असे मत कृषी निर्यातक्षम कक्षाचे तांत्रिक सल्लागार गोविंद हांडे यांनी व्यक्त केले.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.२९) बेदाणा परिषद व भौगोलिक मानांकन अधिकृत वापरकर्ता कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार वेताळ, सर्व कृषी अधिकारी, राज्य द्राक्ष संघाचे माजी अध्यक्ष सुभाष आर्वे, वर्षा बायो ऑरगॅनिक्सचे संचालन एन. बी. म्हेत्रे, सत्यवान वराळे, संपतराव नलवडे उपस्थित होते.

egram
वाचा:  जोवाड चक्रीवादळ! या तीन राज्यांना सर्वाधिक धोका

गोविंद हांडे म्हणाले, की सांगलीतील बेदाणा आणि हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. आता शेतकऱ्यांनी त्या संस्थेकडे वापरकर्ता म्हणून नोंदणी केली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. तसेच त्याचे ब्रॅडिंग, पॅकिंग आणि विक्रीची साखळी उभी करणे सोपे जाईल. आता शेतकऱ्यांनी स्पर्धेत उतरण्यासाठी आपल्या शेतीमालाचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवला पाहिजे. त्यासाठी मानांकनाच्या निकषानुसार उत्पादन घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यानुसार उत्पादन घेतल्यास दर्जा आणि गुणवत्ता चांगली मिळेल.

वाचा:  राज्यातील शाळांबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाल्या...

ग्राहकांचा कल ब्रँडिंग वस्तू खरेदी करण्याकडे वाढला आहे. त्यामुळे आता ब्रॅंडिगद्वारे बाजारपेठेत आपला बेदाणा आणि हळद विक्रीसाठी आली पाहिजे. बेदाण्यासाठी १८६ शेतकरी अधिकृत वापरकर्ता झाले आहेत. हळद आणि बेदाण्यासाठी अधिकृत वापरकर्ता शेतकऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. शेती पिकांचे भौगोलिक मानांकनासाठी राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

वाचा:  ‘राकेश टिकैत दहशतवादी, कृषी कायदे मागे...’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

सुभाष घुले म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारात सांगली बेदाणा आणि हळद अधोरेखित होणे गरजेचे आहे. त्यासाठी पणन विभागाच्या माध्यमातून विविध योजना आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन व्यवसाय वाढीसाठी चालना मिळेल. सुभाष आर्वे, एन. बी. म्हेत्रे, सत्यवान वराळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मनोजकुमार वेताळ यांनी केले. तर मिरजचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी आभार मानले.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App