म्हणून… राजू शेट्टींनी बारामतीत काढला मोर्चा; सांगितले ‘हे’ कारण

Smiley face < 1 min

पुणे – दुधाच्या दराचा प्रश्न निर्माण होण्याला प्रामुख्याने लॉकडाऊन आणि पर्यायाने केंद्र सरकारच कारणीभूत आहे. लॉकडाऊन झाले नसते, तर गायीच्या दुधाचा भाव किमान ४० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला असता. लॉकडाऊन झाल्याने दुधाचा खप ४० टक्क्यांनी खाली आला. त्यामुळे दुधाचे भाव पडले, जर केंद्राच्या लॉकडाऊनमुळे दुध उत्पादकांचे नुकसान होत असेल, तर सर्वात आधी केंद्राने मदतीसाठी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

वाचा:  अभुतपूर्व गोंधळात राज्यसेभेत कृषी विधेयक मंजूर

राज्य सरकारने दुधाला २७ रुपये भाव द्यायला हवा आणि दुध भुकटी आयातबंदी केली पाहिजे, या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत गुरूवारी (२७ ऑगस्ट) मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी शारदा प्रांगणात माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी ही भूमिका बोलून दाखवली. केंद्राने वास्तविक मदतीसाठी पुढे यायला हवे होते, प्रत्यक्षात केंद्र सरकार काहीच करताना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून दुध उत्पादकांच्या वाट्याचे जवळपास दीडशे कोटी रुपये लाटले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

वाचा:  उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत; पण...

दरम्यान, दुध दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चांची मालिका सुरु केली असून, प्रत्येक जिल्ह्यात एक मोर्चा काढला जात आहे. यात सोलापूर, अहमदनगर, सातारा येथे मोर्चे झाले आहेत. पुणे जिल्ह्याचा मोर्चा बारामतीत काढला आहे. पुण्याची कोरोनाची स्थिती आणि तेथे जनावरे घेऊन जाणे अवघड असल्याने आम्ही बारामतीत मोर्चाचे नियोजन केल्याचे राजू शेट्टी म्हणाले. उस्मानाबादचाही मोर्चा भूम येथील प्रांत कार्यालयावर नेणार आहे, केवळ बारामती म्हणून येथे मोर्चाचे नियोजन केले नसल्याचाही खुलासा त्यांनी यावेळी आवर्जून केला.

वाचा:  कांदा निर्यातबंदीची शेतकऱ्यांवर कुऱ्हाड

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App