राजू शेट्टींचा शरद पवारांना शह?; दूध दरासाठी बारामतीत आंदोलन

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दूध दरवाढीसाठी आंदोलने होत आहेत. भाजप आणि विविध शेतकरी संघटनांनी दूधाला योग्य दर मिळावा, यासाठी आंदोलने केली. दूध दरावाठीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे गुरूवारी (२७ ऑगस्ट) बारामतीत आंदोलन तकणार आहेत. यावेळी त्यांनी ‘मी येतोय तुम्हीही या’ अशी साद दूध उत्पादक शेतकऱ्यांना घातली आहे.

वाचा:  शेतकरी आंदोलनामुळे पंजाब हरियाणात राजकीय समिकरणे बदलणार?

माजी खासदार राजू शेट्टी हे दूध दरवाढीसाठी बुधवारी बारामतीत दूध उत्पादकांन शेतकऱ्यांना घेवून मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जय्यत तयारी केली आहे. काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी विधान परिषदेच्या आमदारकी संदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर राजू शेट्टी शरद पवार आणि राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला टोकाचा विरोध करणार नाहीत, असे वाटत होते. मात्र, राजू शेट्टी यांनी दूध दरवाढीसाठी बारामतीत आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेट्टी हे वेगवेगळ्या जिल्ह्यात दूधदर वाढीसाठी आंदोलन करीत आहे.

वाचा:  क्युआर कोड स्कॅन करा अन् केळी खा बिनधास्त

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App