विलासराव देशमुख यांच्या आठवणीत राजू शेट्टींची भावनिक पोस्ट, म्हणाले…

Smiley face < 1 min

ई ग्राम टीम :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पुन्हा जाग्या केल्या आहेत. २००७ साली राज्यात सुरू असणाऱ्या दुध आंदोलनाच्या वेळी विलासराव देशमुख अमेरिकेत असतानाही त्यांना राज्याची काळजी होती.  

आज माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्यस्थिती आहे. यानिमित्ताने राजू शेट्टी यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणीत फेसबुक पोस्ट केली आहे.

वाचा:  सिंधुदुर्ग जिल्हयात पावसाचा जोर ओसरला; पण...

राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “२ जुलै २००७ रात्रीचे दोन वाजता माझा मोबाईल वाजला “राजू मी विलासराव बोलतोय सध्या मी अमेरीकेत आहे. उद्या आर आर यांच्याशी दुध दरासंदर्भात चर्चा करून आंदोलन मागे घ्या मी राज्यात आल्याबरोबर निर्णय घेतो आणि त्यांनी निर्णय घेतला सुध्दा…साहेब आज तुमची अनुपस्थिती जाणवते.”

वाचा:  कृषी विधेयके एका झटक्यात मंजूर करण्याची आवश्यकता नव्हती- शरद पवार

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App