आरबीआयचे नियंत्रण सहकार मोडीत काढण्यासाठीच : शरद पवार

Smiley face < 1 min

ई ग्राम : सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण वाढवून देशातील सहकार चळवळ हळूहळू मोडीत काढण्याकडे केंद्र सरकार वाटचाल करत आहे, असे स्पष्ट करून देशाच्या इतिहासात प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत आहे. यावर कोरोनामुळे देशातील जनता सर्व काही सजन करतेय, अशीच भावना त्यांची झाली आहे. जनतेच्या भावनांचा गैरफायदा केंद्र सरकार घेत आहे, अशी सडेतोड टिकाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली.

खासदार शरद पवार शनिवारी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शासकिय विश्रामृहात पत्रकारांशी संवाद साधला. सहकारी बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. याबाबत आपले मत काय, यावर श्री. पवार म्हणाले, सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण वाढविले आहे. यातून देशातील सहकार चळवळ हळूहळू मोडीत काढण्याकडे केंद्र सरकार वाटचाल करत आहे.

egram

सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत, या प्रश्‍नावर त्यांनी कोरोनात सोशल डिस्टिन्सिंग पाळले जाणार नाही, परिणामी संसर्ग वाढण्याची भिती असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंधन दरवाढीच्या प्रश्‍नावर बोलताना श्री. पवार म्हणाले, पेट्रोल व डिझेलची दरवाढ दररोज होत आहे. भारताच्या इतिहासात इतक्‍या मोठ्याप्रमाणात इंधन दरवाढ पाहिली नव्हती.

देशाची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडण्याचे नियोजन करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम सर्वसामान्यांसह विविध घटकांवर दिसत असतो. पण लॉकडाउनच्या काळात लोकांनी शासनाच्या विरोधात बोलणे सोडले आहे. त्याऐवजी परिस्थितीशी दोन हात करत जनता सर्व काही सजन करत आहे. जनता सर्व काही सहन करतेय अशीच भावना निर्माण मोदी सरकारची झाली आहे. जनतेच्या भावनेचा गैरफायदा केंद्र सरकार घेतयं, अशी टिकाही श्री. पवार यांनी केली.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App