भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजार जागांंसाठी भरती

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – एकीकडे कोरोनाचे संकट सुरू असताना बोरोजगारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. देशात कोरोनामुळे लोकांचे रोजगार जात असताना रेल्वेमध्ये नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरआरबीसी एनटीपीसी २०२० ही भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत रेल्वेमध्ये जवळपास ३५ हजार २०८ रिक्त जागांवर नोकर भरती करण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेंतर्गत रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर वर्गाच्या ३५ हजार २०८ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील २४ हजार ६०५ जागा या पदवीधर तरुणांसाठी तर उर्वरित १० हजार ६०३ जागा या नॉन पदवीधर तरुणांसाठी आहेत. आरआरबी एनटीपीसी २०२० परीक्षा घेण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाने EXAM Conducting Agency (ECA) ची नियुक्ती केली आहे.

egram

मूलभूत वेतनाव्यतिरिक्त इतर भत्ते आणि फायदेही या नोकरीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. ज्या पदासाठी उमेदवाराची निवड झाली आहे त्या श्रेणीनुसार हे भत्ते देण्यात येणार आहेत. यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे (HRA), परिवहन भत्ता (Transport), पेन्शन योजना (Pension), वैद्यकीय फायदे तसेच इतर विशेष भत्तेदेखील लागू असणार आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती –
आरआरबी एनटीपीसी २०२० भरती – आरआरबी एनआरपीसी विभागातील क्लार्क कम टाईपिस्ट, अकाऊंटस क्लार्क कम टाईपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अ‍ॅप्रेंटिससह स्टेशन मास्टर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल.

दरम्यान, आरआरबी एनटीपीसीच्या या पदांसाठी वेगवेगळ्या रेल्वे विभागांच्या रिक्त जागेनुसार पदवीधर आणि नॉन पदवीधर बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे. रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या नोकर भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. या भरतीसाठी सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा ही १८ ते ३३ वर्षे, ओबीसीसाठी १८ ते ३८ वर्षे तर अमुसुचित जाती आणि जमातीसाठी १८ ते २८ वर्षे असणार आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App