सुवर्णसंधी! ६ हजार पदांसाठी नोकर भरती; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community health officer) पदासाठी राजस्थान सरकारने ६ हजार पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीसाठी भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करू शकतात. १६ डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत मुलाकतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी कोणतीही लेखी अथवा संगणकीय परिक्षा घेतली जाणार नाही.

नएचएम राजस्थान सीएचओ भरती 2020अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी (CHO)च्या एकूण ६ हजार ३१० पदे भरली जाणार आहेत. यामध्ये टीएसपी पदासाठी १ हजार ४१ आणि टीएसपी नसलेल्या पदांसाठी ५ हजार २६९ भरती करण्यात येणार आहे. एनएचएम राजस्थान भरती २०२० अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये पगार देण्यात येईल.

egram

काय आहे भरतीसाठी पात्रता –
या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील सामुदायिक आरोग्य किंवा नर्सिंगमध्ये बीएससी असणे आवश्यक आहे. त्याशिवाय जीएनएम किंवा बीएएमएस केलेले उमेदवारदेखील अर्ज करू शकतात.

पदाचे वर्णन आणि अर्जाचे शुल्क –
या भरतीसाठी १८ वर्षे ते ४५ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदारांचे वय १ जानेवारी २०२० ला मोजले जाईल. एनएचएम राजस्थान भरती २०२० साठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून ४०० रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर ओबीसी / एमबीसी / एससी / एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना ३०० रुपये रक्कम जमा करावी लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी भरली जाऊ शकते.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App