नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी भरती; ८० हजार ते १ लाख रुपये पगार

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटमध्ये (नाबार्ड) सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एनएबी फाऊंडेशनच्या मुंबई येशील मुख्यालयासाठी ही भरती निघाली आहे. कराराच्या आधारावर ही भरती होणार आहे. ७ सप्टेंबर २०२० पर्यंत इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल.

सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव असला पाहिजे. तसेच या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे वय हे ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे.

egram

अर्ज कसा कराल?
सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जावून भरतीचे नोटिफिकेशन व्यवस्थित वाचावे. तसेच त्यामध्ये मागण्यात आलेली माहिती उदाहरणार्थ शिक्षण, पात्रता आणि अनुभवासह पूर्ण तपासल्यानंतर अर्ज करा. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून फॉर्म डाउनलोड करावा. त्यानंतर हा अर्ज पूर्ण भरून careers.nabfoundation@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावा. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होईल. मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड ही त्याची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर १: १० या प्रमाणात करण्यात येईल. तसेच रोल नंबरच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदरावारंची माहिती ही www.nabard.org या संकेतस्थळावर दिली जाईल.

या भरतीप्रक्रियेमधून निवड होणाऱ्या उमेदवारांना नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटकडून ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App