रेल्वेत ‘या’ पदांकरिता ‘परीक्षेशिवाय’ होणार भरती..

Smiley face < 1 min

ई ग्राम : भारतीय रेल्वे सेवेवर देखील कोरोना व्हायरसचा परिणाम झाला आहे. कारण गेल्या काही दिवसात काही अपवाद वगळता प्रवासी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, असं असलं तरीही रेल्वेने भरती प्रक्रिया थांबवलेली नाही. रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान आणखी ५५० पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की अर्जदारांना कोणतीही परीक्षा न घेता ही भरती केली जाणार आहे. दहावी पासपासून पदविकाधारक आणि विशेष विषयांसह पदवीधर लोक या पदासाठी अर्ज करू शकतात.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
ईस्ट कोस्ट रेल्वेने आपल्या वैद्यकीय विभागात भरती सुरु केली आहे. ज्या ५६१ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत त्यापैकी २५५ पदे नर्सिंग असिस्टंट आणि ५१ पदे फार्मासिस्ट आणि ड्रेसर/ओटीए/हॉस्पिटल अटेंडंटसाठी २५५ पदे आहेत.
ई-मेलद्वारे पाठवावा अर्ज
या पदांसाठी अर्ज ईमेलद्वारे पाठवावे लागतील. खाली दिलेल्या लिंकवरुन अर्जाचा फॉर्मेट डाऊनलोड करा.

पॅरामेडिकल स्टाफ भरती अधिसूचनेसाठी येथे क्लिक करा.https://indianrailwayrecruitment.in/indian-railway-para-medical-recruitment-notification-apply-online-for-rrb-para-medical-staff-vacancies-www-indianrailways-gov-in/

पूर्व कोस्ट रेल्वे वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. https://eastcoastrail.indianrailways.gov.in/

या ईमेलवर अर्ज पाठवा वर दिलेल्या लिंकवरुन अर्ज डाऊनलोड केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडून आपला अर्ज srdmohkur@gmail.com वर ईमेल करा.

egram

अंतिम तारीख आणि फी:
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२० आहे. अर्जासाठी कोणतीही फी देय नाही.
पात्रता आणि वय:
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा वेगवेगळ्या पदांसाठी वेगळी ठेवण्यात आली आहे. वयाची गणना १ मे २०२० च्या आधारावर केली जाईल.
नर्सिंग अधीक्षक: २५५ पदं
शैक्षणिक पात्रता: बीएससी नर्सिंग, जनरल नर्सिंग किंवा मिडवाइफरीचा तीन वर्षांचा कोर्स
वय: किमान २० आणि कमाल ३८ वर्षे. (आरक्षणानुसार वयाची सवलत उपलब्ध असेल)
फॉर्मासिस्ट: ५१ पदं

शैक्षणिक पात्रता:
विज्ञान विषयांसह १२वी पास.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमध्ये पदविका (आवश्यक)
वय: किमान २० आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे (आरक्षणानुसार वयाची सवलत उपलब्ध असेल)

ड्रेसर/ओटीए/ हॉस्पिटल अटेंडंटः २५५ पोस्ट
शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण
वय: किमान १८ कमाल ३३वर्षे (आरक्षणानुसार वयाची सवलत उपलब्ध असेल)

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App