रायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा

Smiley face < 1 min

रायगड :  दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. पाऊस बंद झाला असला तरी समुद्र किनारी उंचच उंचच लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यासाठी पोलिस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे.

९ ते १२ जून या कालावधीत रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता. त्यानुसार रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. लोकांनी सुद्धा घरात राहणे पसंत केले आहे.

वाचा:  पशुवैद्यकीय दवाखान्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; आमदारांकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी

समुद्र किनारी जिल्हा प्रशासनाकडून लाईफ गार्ड देखील तैनात करण्यात आले आहेत. याचबरोबर रायगड मधील सर्व आस्थापने देखील बंद ठेवण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु आहेत.

दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत तलाव आणि धबधबे देखील बंद राहणार आहेत. खानापूर आणि तळजत येथील तीस ते पस्तीस तलाव आणि धरण परिसरात जाण्यास देखील सक्त मनाई करण्यात आली आहे. तसंच नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वाचा:  पावसाअभावी दीड लाख हेक्‍टरवरील लावणी खोळंबली

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App