अहमदनगर ब्रेकिंग : २११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह


ई ग्राम : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींमध्येही या आजाराची लक्षणे बाह्य स्वरूपात दिसून येत असतील, तर त्याचीही तपासणी करून त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जिल्ह्यातील ३४६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.त्यापैकी २५ व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

एनआयव्हीकडे २३६ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बाधित तीनही रुग्णांची तब्येत ठणठणीत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. जिल्हाधिकारी दिवेदी यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आणि आरोग्य विभागाच्या डॉक्टरांशी चर्चा करून या बाबींचा आढावा घेतला. यापुढील काळात अधिकाधिक सतर्क राहून काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

Read Previous

राज्यातील बेघर तसेच स्थलांतरित कुटुंबांना तात्काळ मदत करण्याची मागणी

Read Next

नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू