पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात होणार ६० कोटींचे रस्ते

Smiley face < 1 min

बुलडाणा : जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत ६० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून जिल्हाभर रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत, अशी माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली.

मेहकर येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष असलेले खासदार जाधव यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्वक कामे करून ग्रामीण भागाच्या रस्त्याचे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

egram

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ८६.६१० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ६०.७२ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. यात बुलडाणा तालुक्यातील उमाळा-अंभोडा, साखळी बुद्रूक ते हतेडी बुद्रूक, चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे ते भोगावती, शेलूद ते हातणी, जळगाव जामोद तालुक्यातील बुरखेड-पळशी सुपो, खामगाव तालुक्यातील रोहणा-निमकवळा पोरज, लोणार तालुक्यातील परडी ते जिल्हा हद्दीपर्यंत, मलकापूर तालुक्यात वाकोडी-खोपोडी-लोणवाडी, गाडेगाव -घिरणी -उमाळी, मेहकर तालुक्यात दुधा-कळमेश्वर, ब्रम्हपुरी-रायपूर-सोनारगव्हाण- जानेफळ, मोताळा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग २७२ ते ईब्राहिमपूर, कंबरखेड-हनवतखेड, नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग २७७ ते बुर्टी-काटी, संग्रामपुर तालुक्यात दुर्गादैत्य- आवार ते पातुर्डा आणि सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी- दुसरबीड या रस्त्यांचा समावेश आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App