दूध दराचे श्रेय घेण्यासाठीच भाजपचे आंदोलन – रोहित पवार

Smiley face < 1 min
रोहित पवार
दूध दरासाठी आंदोलन मात्र इंधन दरवाढीवर भाजपची आळीमिळी गुपचिळी - रोहित पवार

अहमदनगर – राज्यातील दूध दराचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. यासाठी बैठकाही झाल्या आहेत आणि म्हणूनच भाजपने आंदोलन जाहीर केले आहे. मात्र, केंद्र सरकारने राज्यामध्ये १५ हजार टन दूध पावडर आयात केली त्यावर भाजपची आळीमिळी गुपचिळी आहे. तर देशात हेत असलेल्या इंधन दर वाढीच्या विरोधात भाजपने आंदोलन करण्याचे आव्हान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. शुक्रवारी (३१ जुलै) ते नगरमध्ये बोलत होते.

वाचा:  खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, नागपूरवरून मुंबईला हलविले

पवार म्हणाले की, २०१६ मध्ये जीएसटीच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे १६ हजार कोटींचे नुकसान झाले, त्याबद्दलही भाजप बोलत नाही. जीएसटीचा परतावा दिला म्हणजे केंद्र सरकारने उपकार केले नाहीत. केंद्र सरकार सांगते, की ३३ हजार कोटी रुपयांची मदत महाराष्ट्राला दिली. मात्र, राज्यातील भाजप ७५ हजार कोटी रुपये दिले, असे सांगत आहे. हा निधी जीएसटीच्या सेस फंडातील आहे. हा पैसा जनतेचा आहे. भाजपने जनतेला सत्य काय आहे ते सांगावे. दूधाच्या प्रश्नावर भाजप राजकारण करत असल्याची टीकाही पवार यांनी केली.

वाचा:  अजित पवार राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर एक महिन्यात कोसळेल, असे विरोधक सांगत होते, मात्र, आता सहा महिने झाले आहेत. बोलता बोलता पाच वर्षे कधी पूर्ण होतील, हे भाजपाला समजणारही नाही. सध्या कोरोना नियंत्रणच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अर्थकारण रुळावर आणून जनतेचे आरोग्यही जपायचे आहे, असे पवार म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिराच्या निकालाचे शरद पवार यांनी स्वागतच केले होते. शरद पवार यांच्या म्हणण्याचा अर्थ केवळ गर्दी होऊ नये, एवढय़ापुरता मर्यादित होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा उमा भारती काय बोलत आहेत, याला महत्त्व नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

वाचा:  भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर; नवाब मलिकांचा दावा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App