रोहित पवारांचा पंतप्रधानांना खोचक टोला, म्हणाले…

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार अधूनमधून ट्विट करून भाजपला डिवचत असतात. मंगळवारी (१७ नोव्हें) बारामतीतील एका चहाच्या दुकानच्या उद्घाटनासाठी पवार गेले होते. त्यावेळेचे फोटो शेअर आणि ट्विट करत रोहित पवारांनी पंतप्रधनांना टोला लगावला आहे.

राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं, असं म्हणत रोहित यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये अनेकदा मी लहानपणी चहाच्या स्टॉलवर काम करायचो, हे आवर्जून सांगतात. ही आठवण सांगताना ते भावूकही होतात. असंही पवार म्हणाले आहेत.

वाचा:  अतिवृष्टीच्या मदतीत भेदभाव करू नका - बच्चू कडू
https://twitter.com/RRPSpeaks/status/1328719567653269506

रोहित पवार ट्विटमध्ये म्हटलं की, राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं, पण आमच्या बारामतीत मात्र राहुल चौधरी यांनी ‘खासदार’ तर माळेगावमध्ये तेजस तावरे यांनी ‘आमदार’ या नावाचंच चहाचं हॉटेल सुरू केलंय. त्यांचं उदघाटन करुन शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, इथल्या चहाची टेस्टही भन्नाट आहे, बरं का! ती घ्यायला तुम्हीही विसरु नका!, असंही पवार यांनी सांगितले आहे.

वाचा:  दुर्गम भागातील पूरग्रस्तांसाठी महावितरणकडून सौर दिव्याचे वितरण

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App