उध्दव ठाकरे मातोश्रीबाहेर पडत नाही; रोहित पवारांचं प्रत्युत्तर

Smiley face < 1 min

मुंबई – दिवसेंदवस राज्यात कोरोनाचे संकट भयंकर होत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाह्रेर पडत नसल्याची जहरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. कोरोनामुळे आज राज्यात सर्वत्र विस्कळीतपणा सुरू आहे, असेही दरेकर म्हणाले. दरेकरांच्या टीकेला सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दरेकरांच्या टीकेला प्रत्यत्तर देताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही म्हणत आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत. ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करताय ना, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. तसेच जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे.

वाचा:  देशात कुठेही युरिया टंचाई नाही - केंद्र सरकार

माझ्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली होती. काही अपवाद वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. मात्र, सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला होता.

वाचा:  गृहिणींनो आता दुधी भोपळ्यापासून बनवा टुटीफ्रूटी अन् पावडर

कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. कोरोना संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

वाचा:  कांदा निर्यातबंदीची शेतकऱ्यांवर कुऱ्हाड

दरम्यान, एका होतकरू पत्रकारचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पत्रकाराच्या निधनानंतर चौकशी करून काय उपयोग? त्यातून काय साध्य होणार? पुण्याला मुख्यमंत्री येऊन गेले. तेथे कोविड सेंटर आणि आरोग्य व्यवस्था उभी केली, पण त्याला जर आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसेल तर त्याचा काय उपयोग? असा सवालही त्यांनी केला.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App