रायगड जिल्ह्याला १०० कोटी रुपयांची मदत, उद्धव ठाकरेंची घोषणा

Smiley face < 1 min
उद्धव ठाकरे (फाईल फोटो)

ई ग्राम टीम : निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला सर्वाधिक जास्त फटका बसला आहे. या वादळात अनेकांच्या घरांवरचे पत्रे, कौले उडून गेली, तर अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रायगड जिल्ह्याला तातडीने १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे
१) नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे झाली की भरपाई देण्यात येणार
२) वीज पूर्ववत करण्यासाठी इतर जिल्यातून पथके येणार
३) पंचनामे करण्यासाठी ४ ते ६ दिवस लागणार
४) रायगडसह इतर जिल्ह्यांनाही मदत देण्यात येणार
५) ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे, त्याविषयी माहिती घेऊन मदत दिली जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही

दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी (दि.४) रोजी रायगड जिल्ह्याचा दौरा करून निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. विजेचे पडलेले खांब आणि तुटलेल्या तारांच्या दुरुस्तीचे काम तात्काळ पूर्ण करून जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्याचे निर्देश त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App