पुणे नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी; कृषी, पर्यटनाला चालना

Smiley face < 1 min

ई ग्राम : गेली अनेक वर्षे प्रशासकीय प्रक्रियेत अडकलेल्या पुणे- नाशिक रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने अखेर मंजुरी दिली आहे. आता राज्य सरकारने या बाबत वेगाने पावले टाकली तर, अल्पावधीतच नाशिक रेल्वे रुळावर येऊन सुसाट धावणार आहे. सेमी स्पीड रेल्वे पुण्यापासून अवघ्या दोन तासांत नाशिकपर्यंतचे अंतर पार करू शकणार आहे. या रेल्वेद्वारे पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील कृषी, पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असून, मोठ्याप्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यावर आणि आर्थिक तरतूद केल्यावर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. रेल्वेसाठी सुमारे १ हजार ५०० हेक्‍टरचे भूसंपादन करावे लागणार आहे. या प्रकल्पामुळे मार्गालगतच्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील कृषी आणि पर्यनट क्षेत्रा बरोबरच विविध औद्योगिक वसाहतींनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे

असा आहे प्रस्ताव
– पुण्यातून हडपसर स्थानकातून रेल्वे सुटून नाशिक रोड स्थानकाला जोडणार.
– पहिल्या टप्प्यात रेल्वेला सहा डबे. १२ ते १६ पर्यंत वाढविताही येतील.
– मार्गावर २४ स्थानके,१८ बोगदे.
– १६ हजार कोटी रुपयांचा खर्च
– महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिल्यावर १ हजार२०० दिवसांत प्रकल्प पूर्ण करणार

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App