कोरोनाने मृत्यु झाल्यास महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान

Smiley face < 1 min

ई ग्राम : राज्यातील सुमारे 2 कोटी 60 हजार ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व दर्जेदार सेवा देण्यासाठी कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावात अविश्रांत कार्यरत असणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना 30 लाख  रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महावितरणने घेतल्याची माहिती महावितरणाच्या जनसंपर्क विभागाने दिली.

महावितरणमध्ये संचालन व दुरूस्तीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या  कंत्राटी कर्मचाऱ्यांना (बाह्यस्त्रोत) तसेच महावितरणच्या विविध कार्यालयात कार्यरत असणाऱे सुरक्षा रक्षक यांना देखील 30 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला असल्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले. 

egram

डॉ.राऊत म्हणाले,कोरोनाच्या सार्वत्रिक प्रादुर्भामध्ये महावितरणचे अभियंते,कर्मचारी व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.राज्य प्रशासन कोरोनाचा पराभव करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असतांना राज्यातील सामान्यांना घरातच थांबणे आवश्यक आहे.अशा घरात राहणाऱ्या व घरूनच कामे करणाऱ्यांना महावितरणने 24 तास अखंडित वीजपुरवठा देऊन मोठा दिलासा दिला आहे.यादृष्टिने महावितरणचे कर्मचारी देखील हे कोरोनायोध्दे ठरलेत.कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभागाने गांभीर्य राखून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

महावितरणचे तांत्रिक तसेच अतांत्रिक प्रवर्गात कार्यरत असणारे सर्व अभियंते,अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू राहणार आहे.कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा कोविड-19 विषाणूने झाला असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र हे शासकीय, पालिका, महानगरपालिका, आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे.हे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App