वीजबिल माफीसाठी स्वाभिमानी आक्रमक; नागपूर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको

Smiley face < 1 min

बुलडाणा : गेल्या वर्षातील लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे व सक्तीची विजबिल वसुली थांबवून कनेक्शन कापणे तत्काळ बंद करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  आज शुक्रवारी (ता.१९) जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन केले. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपूर-औरंगाबाद महामार्गावर पेठ (ता.चिखली जि.बुलडाणा) येथे रास्तारोको करण्यात आले.

सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ न केल्यास ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या घरांचे वीज कनेक्शन कापण्याचा इशारा यावेळी तुपकर यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वीज बिल वसुलीच्या मुद्यावर संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार शुक्रवारी जिल्हयात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावर अडीच तास वाहतूक खोळंबली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, या आंदोलनात नितीन राजपूत, विनायक सरनाईक, सुधाकर तायडे, रामेश्वर अंभोरे, संतोष शेळके,भारत खंडागळे, अनिल चव्हाण, रविराज टाले, गणेश थुट्टे, सुदर्शन वाघमारे, अविनाश झगरे, छोटू झगरे, अवचितराव वाघमारे, कैलास शेळके, भाकडे, ईश्वर शेळके,भरत शेळके, परमेश्वर शेळके, बबन कुटे उपस्थित होते.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App