शिर्डी मध्ये होणार सव्वा रुपयात…..

Smiley face 2 min

ई-ग्राम : शिर्डी, जि. नगर (प्रतिनिधी) : साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने अठरा वर्षांची परंपरा असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर (२६ एप्रिल) आयोजन करण्यात आले आहे. विविध जाती-धर्मातील १०१ जोडपी एकाच मंडपाच्या छताखाली केवळ सव्वा रुपये शुल्कात थाटात विवाहबद्ध होणार आहेत.
सोहळ्याचे संयोजक व माजी नगराध्यक्ष कैलास (बापू) कोते यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या सोहळ्यात विवाहबद्ध होऊ इच्छिणाऱ्या वधू-वरांची नाव नोंदणी सुरू झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातून आलेले वधू-वर व वऱ्हाडी मंडळींना ‘घरासमोर एक झाड लावा आणि शौचालयाचा वापर करा,’ असा सामाजिक संदेश यावेळी दिला जाणार आहे.

वाचा:  पशुपालकांना अनुदानावर करणार दुधाळ जनावरांचे वाटप

श्री. कोते म्हणाले, की विवाह सोहळ्यांवरील वाढत्या खर्चामुळे ग्रामीण भागातील छोटे शेतकरी व शेतमजूर कर्जबाजारी होतात. त्याचा फटका त्या कुटुंबातील मुला मुलींच्या शिक्षणाला बसतो. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागे हे एक कारण असल्याचे निष्पन्न झाले, ही समस्या लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम हाती घेतला. गेल्या अठरा वर्षात या उपक्रमाच्या माध्यमातून विवाहबद्ध झालेली विविध जाती-धर्माची अठराशेहून अधिक जोडपी सुखाने संसार करीत आहेत. या उपक्रमाच्या प्रसार आणि प्रचाराला हातभार लावीत आहेत.

वाचा:  पशुपालकांना अनुदानावर करणार दुधाळ जनावरांचे वाटप

या सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्षपद आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे भूषविणार आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जि. प.च्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, नगराध्यक्ष अर्चना कोते, आमदार आशुतोष काळे यांच्यासह साधू-संत व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष सुमित्राताई कोते, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, पंकज लोढा, सामाजिक कार्यकर्ते भगीरथ होन, राजेंद्र चौधरी यांच्यासह विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाचा:  पशुपालकांना अनुदानावर करणार दुधाळ जनावरांचे वाटप

नावनोंदणीसाठी येथे करा संपर्क : संदीप डेरे : ९८५०५०००८०, अनिल शेळके : ९०९६१७४०५०, वाल्मीक बावचे : ९८२३१४१७७४, शफीक शेख : ९७६३२९८७१२

“साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीन आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन’मध्ये नोंद झालेली आहे. केवळ सव्वा रुपया शुल्क आकारून संपन्न होत असलेल्या या सोहळ्यातील वधू-वरांना संसारोपयोगी भांडी, नवा पोशाख व सोन्याचे मंगळसूत्र भेट दिले जाते. शहरातून थाटात मिरवणूक आणि वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन दिले जाते”. -सुमित्राताई कोते, माजी नगराध्यक्षा, शिर्डी

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App