धक्कादायक! चंद्रपूर जिल्हयात वर्षभरात ‘इतक्या’ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Smiley face < 1 min

चंद्रपूर : जिल्हयात गेल्या वर्षभरात तब्बल ६९ आत्महत्यांची नोंद झाली. त्यातील अवघी ३१ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. एका प्रकरणाची फैरचौकशी केली जात आहे तर १२ प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणाची चौकशी कधी पूर्णत्वास जाईल याविषयी कोणतीच कालमर्यादा नसल्याने अपात्र आणि फेरचौकशी सुरु असलेल्या शेतकरी कुटूंबियांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दरवेळी हंगामात शेतीची मशागत, पेरणी, कापणी, बियाणे, खते व किटकशनाशके विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज राहते. शेतमाल विक्रीतून आलेल्या पैशातून वर्षभर कुटूंबियांच्या गरज भागविण्यासाठी किराणा व इतर बाबींवर झालेल्या खर्चाची तरतूद होते.

वाचा:  ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

देणीदारांची देणी देखील चुकवावी लागतात. परिणामी निविष्ठांसाठी लागणाऱ्या पैशाची सोय म्हणून शेतकरी बॅंकांकडे जातात. अशावेळी विविध कारणाआड बॅंकांकडून त्याची अडवणूक होते. अशावेळी शेतकरी खासगी सावकाराचा सुलभ पर्याय निवडतात. मात्र त्यांचे व्याजदर परवडणारे नसल्याने हे कर्ज चुकवितांना शेतकऱ्यांभोवती फास आवळला जातो आणि पुढे दिवसेंदिवस तो अधिक घट्टच होतो.

वाचा:  ‘आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्वराज्य संस्था निवडणूका नाहीत’

दरम्यान, या कारणांमुळे जिल्हयात २०२० मध्ये ६९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. यातील अवघी ३१ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत. एका प्रकरणाची फेरचौकशी सुरु आहे तर १२ प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हयात २०१९ मध्ये ५७ शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. यातील ४० प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली होती.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App