धक्कादायक! पित्यानेच केला सात वर्ष पोटच्या मुलीवर बलात्कार

Smiley face < 1 min

ई ग्राम : पित्यानेच पोटच्या मुलीचे सात वर्षे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरातील प्रगतीनगर भागात घडला. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम बापाविरोधात बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत २० वर्षीय पिडीतेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ती १३ वर्षे वयाची असल्यापासून पित्याकडून तिच्यावर अत्याचार केला जात होता. गेली सात वर्षे प्रगतीनगर येथे राहत्या घरात ही घटना घडली. २०१३ मध्ये या मुलीला मासिक पाळी सुरु झाली. त्यामुळे तिला त्रास होवू लागला. याचा फायदा घेत तिच्या बापाने तिच्या जवळ जात तुला मासिक पाळीमुळे पोटदुखीचा त्रास होत आहे. त्याच्यावर माझ्याकडे एक उपाय आहे असे म्हणत वारंवार तिच्यावर बलात्कार केला.

वाचा:  नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदान

ती वयाने लहान असल्याने आणि बापाला घाबरत असल्याने तिने यासंबंधाची कुठेही वाच्यता केली नाही. त्याचाच गैरफायदा घेत नराधम बापाने सलग सात वर्षे वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुझ्याकडे बघून घेईन अशी धमकी तिला दिली होती.

दरम्यान, बापाचा त्रास असह्य होवू लागल्याने तिने आईला व अन्य नातेवाईकांना या प्रकाराबाबत कल्पना देत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. नराधम बापाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाचा:  ‘मी मुख्यमंत्री असताना फोन टॅपिंग नाही’

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App