पंतप्रधान आवास योजनेमध्ये सिंधुदुर्ग राज्यात अव्वल

Smiley face < 1 min

सिंधुदुर्ग : पंतप्रधान आवास योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम तर देशात ९३ वा क्रमांक पटकाविला आहे. या योजनेअंतर्गत पाच वर्षाचे मूल्यमापन करण्यात आले होते.

पंतप्रधान महाआवास अभियानाचे काम जिल्ह्यात गतीने सुरू आहे. बेघर आणि कच्चे घर असलेल्या कुटुंबाचा सर्व्हे करून त्यांची ब यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ३ हजार ९९४ कुटुंबे बेघर ठरली होती. त्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी शासनाकडून घरकुल उभारणीचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले जाते. हे घरकुल उभारणीकरिता शासन १ लाख २० हजार रुपये लाभार्थ्याला देते. यातील ६० टक्के हिस्सा केंद्र तर ४० टक्के हिस्सा राज्य शासनाचा आहे.

egram

गेली पाच वर्षे या योजनेचे काम जिल्ह्यात सुरू आहे. या पाच वर्षांचे मूल्यमापन नवी मुंबई येथील ग्रामीण गृहनिर्माण राज्य व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून करण्यात आले होते. या मूल्यमापनात सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८६.३२ टक्के गुण मिळाले असून जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

दरम्यान, देशात देखील जिल्ह्याला ९३ क्रमांक मिळाला आहे. मूल्यमापन करताना २०१६-१७ पासून दिलेल्या उद्दिष्टांपैकी किती टक्के काम पूर्ण झाले. ग्रामसभाचे ठराव, कुटुंबाचे आधार लिकींग या गोष्टीचा विचार करण्यात आला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App