आता अवघ्या अर्ध्यातासात होणार माती ‘परीक्षण’

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – आता अवघ्या अर्ध्या तासात शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माती परिक्षणाचा अहवाल मिळणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ रायपूरच्या कृषी शास्त्रज्ञांनी ही पोर्टेबल माती परीक्षण किट तयार केले आहे. शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या पोर्टेबल माती परिक्षण किटचे पेटंट करण्यात आले आहे. या पोर्टेबल कीटची किंमत ६ हजार रुपये असून शेतकऱ्यांना यासाठी २० ते २५ टक्के अनुदान मिळणार आहे.

या पोर्टेबल माती परिक्षण कीटच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना आपल्या शेताताल मातीचे जागेवरच परिक्षण करता येणार आहे. या कीटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि पीएच ची माहिती मिळणार आहे. डॉ. एस.के. पाटील,डॉ. ललित श्रीवास्तव, डॉ. व्ही.एन. मिश्रा आणि डॉ. आर.ओ. दास या कृषी शास्त्रज्ञांनी हे माती परिक्षण कीट विकसीत केले आहे. डॉ. दास यांनी सांगितले की, सध्या हे कीट इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ रायपूर यांच्यामार्फत विकले जाणार आहे. हे पोर्टेबल कीट भविष्यात शेती क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल. शेतकरी स्वावलंबी होऊन पीक निवड आणि उत्पादनासंदर्भात योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतील.

वाचा:  ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’

पोर्टेबल माती परिक्षण कीटची वैशिष्ठ्ये –
या पोर्टेबल कीटमध्ये मातीच्या आरोग्या संदर्भात तक्ता तयार करण्यात आला आहे. या तक्त्यामध्ये माती, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, विद्युत चालकता आणि पीएच मूल्य यांचे प्रमाण किती असावे. याची माहिता असणार आहे. माती परीक्षणाच्यावेळी विहित प्रमाणात रासायनिक पदार्थ मिसळले असता तेव्हा मातीचा रंग बदलू लागतो. तसेच मातीमध्ये कोणत्या खतांचा अभाव आहे, हे मातीच्या रंगावर अवलंबून आहे.

वाचा:  पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार

दरम्यान, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माती परीक्षण करून माती आरोग्य कार्ड (soil health car) देण्यात आले आहे. या हेल्थ कार्डमध्ये कोणत्या शेतात कोणत्या खताचा अभाव आहे, हे स्पष्टपणे सांगितले जाते. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्येही चाचणी केंद्रे स्थापन केली गेली आहेत. जेथे माती परिक्षणाचा निकाल येण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. आता या पोर्टेबल कीटमुळे शेतकऱ्यांना माती परीक्षण केंद्रावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.

वाचा:  पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App