उन्हाळी सोयाबीनसाठी सोलर आधारित तुषार सिंचन

Smiley face < 1 min

ई ग्राम :  महाराष्ट्रात आजघडीच्या प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये वरपूड (जि.परभणी) येथील चंद्रकांत देशमुख यांचे नाव अग्रभागी आहे. भविष्यात महाराष्ट्राच्या शेतीला आकार देणाऱ्या पहिल्या दहा शेतकऱ्यांच्या यादीत त्यांचा समावेश  करावा लागेल.  या लौकिकाला साजेशी कामगिरी नोंदवत सहा एकरात 70 क्विंटल उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन त्यांनी घेतलेय. खास बाब अशी, की देशाची खरीप हंगामातील सोयाबीनची प्रतिहेक्टरी उत्पादकता आहे सुमारे एक टन. त्या तुलनेत देशमुख सरांनी उन्हाळ हंगामात हेक्टरी 2.9 टनापर्यंत मजल मारली आहे. म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत 190 टक्क्यांनी जास्तीची उत्पादकता गाठली आहे.  

उन्हाळ्यात सोयाबीनचे यशस्वी उत्पादन घेणारे वरपुड (परभणी) येथील चंद्रकांत देशमुख हे सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकरी आहेत. जगभरात सुरू असलेल्या सूक्ष्मसिंचन विषयक प्रयोगांचा ते अभ्यास करतात आणि आपल्या शेतात प्रात्याक्षिक घेतात. त्यातून भारतीय हवा-पाण्यानुसार शाश्वत मॉडेल विकसित करतात. सोयाबीनबाबतही त्यांनी असेच केलेय.

egram

दरम्यान, उन्हाळ्यात सोलर आधारित तुषार सिंचनात – जस जसे तापमान वाढत जाईल, त्याप्रमाणात प्रेशर संतुलित करून पाणी दिले जाते. ऐन उन्हात फॉग, धुके तयार करून सोयाबीनची पाने ओले राहतील, अशी पद्धत बसवली आहे. उन्हाळी सोयाबीन यशस्वी झाले याचे श्रेय चांगले बियाणे, पीकसंरक्षण आदी बाबींनाही आहे. मला तुषार सिंचनातले कळते, इतर बाबतीत मी शास्त्रज्ञांचा सल्ला घेतो, असे ते सांगतात.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App