शेतक-यांना त्वरीत पीककर्ज व बियाणे कंपन्यांकडून सोयाबीन पिकाचा मोबदला द्यावा

Smiley face < 1 min

ई ग्राम : शेतक-यांची कर्जमाफी होऊन जवळपास तीन महिने झाले असून अजुनपर्यंत शेतक-यांना कर्ज पुरवठा झाला नाही. कर्जाच्या दोन यादीत ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्यांनाही कर्ज मिळाले नाही आणि बँकानी ज्या शेतक-यांना विश्वासात न घेता फक्त बँकेच्या वसुली व्हावी या हेतुने पुनर्गठन केले त्यांना कर्जाचा लाभ बँकेच्या चुकीमुळे मिळणार नाही.

याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी जागर मंचाने केली आहे. शेतकरी जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून यामध्ये पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर सरकारने कारवाई करावी असा ठरावही घेण्यात आला.

वाचा:  'स्वतःच सरकार पाडायला जे गुण लागतात ते गुण संज्याकडे'; निलेश राणे यांनी बोचरी टीका

शेतकऱ्यांनी आपला पीकविमा बँकेत भरूनही बँकांच्या चुकीमुळे शेतक-यांनी भरलेली विम्याची रक्कम विमा कंपन्यांपर्यंत पोचली नाही. त्यामुळे शेतक-यांचे पिकविमाचे पैसे आजपर्यंत त्यांच्या खात्यात आलेले नाही. पिकविम्याची रक्कम भरूनही जर विम्याच्या लाभापासू शेतकरी वंचित राहत असतील तर याची दखल सरकारने त्वरित घेतली पाहिजे असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीमध्ये अनेक बियाणे कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतक-यांवर वर्षभर आर्थिक ताण पडणार आहे. याला बियाणे कंपन्याच जबाबदार आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ज्या कंपनीचे बियाणे पेरले असेल त्या कंपनीने शेतक-यांना सोयाबीन पिकाची पुर्ण भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाचा:  बियाणे प्रमाणीकरणाबाबत सरकारची उदासीनता चव्हाट्यावर

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांची पेरणी उलटली असेल त्यांनी पेरलेल्या बियाण्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे देऊन गावपातळीवर त्याचे पंचनामे करून दोन जुलैपर्यंत कृषी विभागाकडे पाठवावेत असे आवाहन जागर मंचाने केले आहे. बैठकीला कृष्णा अंधारे, मनोज तायडे, जगदीश मुरूमकार, प्रशांत गावंडे, विजय देशमुख, शेख अन्सार, ज्ञानेश्वर गावंडे, दिपक गावंडे, विठ्ठलराव पाटील, राजु वहीले आदी शेतकरी जागर मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वाचा:  कोरोनानंतर चीनमध्ये नवा आजार; जाणून घ्या 'ब्लॅक डेथ' आजाराविषयी

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App