सोयाबीन उत्पादकांच्या तक्रारींचा विदर्भात पाऊस

Smiley face < 1 min

ई ग्राम : गेल्या हंगामात ऐन काढणीच्यावेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनची प्रत खालावली. सोयाबीन बिजोत्पादनालाही याचा फटका बसल्याने यावेळी विदर्भातील सर्वच जिल्हयात बियाणे उगवण विषयक तक्रारीत प्रचंड वाढ झाली आहे. विदर्भातील अकरा जिल्हयात सुमारे अडीच हजारापेक्षा अधिक तक्रारी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे केल्याचे सांगण्यात येते. यामध्ये यवतमाळ जिल्हयाची आघाडी असून या जिल्हयातील तक्रारदार शेतकऱ्याची संख्या 700 पेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पूर्व विदर्भातील वर्धा 1 लाख 13 हजार हेक्‍टर, नागपूर जिल्हयात एक लाख 10 हजार हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड होते. उर्वरित भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे भात उत्पादक जिल्हे असल्याने या भागात सोयाबीन क्षेत्र अल्पसे आहे. त्यामध्ये भंडारा जिल्हयात 6591, चंद्रपूर 74 हजार 396 तर गडचिरोली जिल्हयात 271 हेक्‍टरवर सोयाबीन लागवड होते. गोंदिया जिल्हयात सोयाबीन घेतलेच जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाचा:  बाजारभाव अपडेट ०७ जुलै २०२०: जाणून घ्या कोबी, फ्लॉवर , मिरची, वांगी, भेंडी, शेवगा आणि शिमला मिरचीचे बाजारभाव.

नागपूर विभागात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता मात्र पावसाने उघडीप दिल्याने बियाणे उवगलेच नसल्याच्या तक्रारींचा नुसता पूर आला आहे. जिल्हयात 113.2 टक्‍के पाऊस झाला आहे. परंतू सुरुवातीला झालेल्या पावसानंतर मोठा खंड पडला आणि बियाणे अंकुरलेच नाही. पश्‍चिम विदर्भातील अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती हे जिल्हे सोयाबीन उत्पादनासाठी आघाडीवर आहेत.

वाचा:  प्रतिकूल परिस्थितीत कष्टकरी शेतकरी राजा समाजासाठी झटला - कृषिमंत्री दादा भुसे

बुलडाणा जिल्हयात 4 लाख 92 हजार, अकोला जिल्हयात 2 लाख 21 हजार पैकी 43 हजार हेक्‍टरवर, वाशीम तीन लाख चार हजारपैकी एक लाख साठ हजार, अमरावतीत सरासरीच्या 2 लाख 94 हजारपैकी 86 हजार 304, यवतमाळ 2 लाख 76 हजारपैकी 1 लाख 25 हजार याप्रमाणे सोयाबीनची लागवड आहे. यामध्ये सर्वाधीक उगवणविषयक तक्रारी यवतमाळ जिल्हयात नोंदविण्यात आल्या आहेत. या जिल्हयात 700 पेक्षा अधिक तक्रारींची नोंद झाल्याची माहिती आहे.

वाचा:  पुण्यात लॉकडाऊन होण्याची चर्चा, प्रशासन म्हणतय…

उर्वरित दहा जिल्हयांमध्ये देखील तक्रारींचा वाढता ओघ असून तीन हजारावर या तक्रारी असल्याचे सांगीतले जाते. मात्र तक्रारी संकलीत नसल्याने त्याविषयी ठामपणे सांगण्यास कृषी विभागाने असमर्थता व्यक्‍त केली. विशेष म्हणजे यावेळी दर वाढविणाऱ्या महाबीजच्याच उगवणविषयक सर्वाधीक तक्रारी आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App