सोयाबीन दरात तेजी कायम; जाणून घ्या बाजारभाव

Smiley face 2 min

नागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना बाजार समितीत हमीभावापेक्षा दुपटीने सोयाबीनचे व्यवहार होत आहे. विदर्भातील सोयाबीनचे हब असलेल्या वाशीम जिल्ह्यातही सोयाबीन सात हजार रुपये क्विंटलने विकल्या जात आहे.

प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्याने विदर्भात सोयाबीन दरात तेजी आली आहे. वाशीम, कारंजा, अमरावती, यवतमाळ तसेच नागपूरच्या कळमना बाजार समितीत सोयाबीन सात हजार रुपये क्विंटलने विकल्या जात आहे. कळमना बाजार समितीत सोयाबीनची जेमतेम दीडशे क्विंटल आवक आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ६५०० ते ७४५० होते. सोयाबीनची नवी आवक येण्यास अजून बराच कालावधी असल्याने दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे.

egram

यापुढील काळात देखील सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांच्या खाली राहणार नाही, असे सांगण्यात आले. बाजारात भुईमूग शेंगाची आवक नियमित ३०००, ३५०० रुपये प्रति क्विंटल दर आहे. गेल्या हंगामात भुईमुगाला ८००० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. या वर्षी मात्र शेंगांची गुणवत्ता नसल्याचे कारण सांगत व्यापाऱ्यांकडून कमी दर दिला जात आहे. शेंगांची आवक २० क्विंटल इतकी जेमतेम आहे.

वाचा:  पावसामुळे गळीत हंगामात अडथळे; ऊसमजुरांची कामे खोळंबली

कळमना बाजार समितीत ज्वारीची आवक गेल्या आठवड्यापर्यंत होती. बाजारातील गव्हाची आवक ८०० क्विंटलच्या आसपास आहे. गव्हाचे दर १६५० ते १८३२ रुपये होते. तांदळाची आवक २० क्विंटल तर दर ५००० ते ५५०० रुपये होते. हरभरा आवक ११८६ क्विंटल तर दर ४४५० ते ४७७२ होते. मुगाचे दर ५३०० ते ५५०० रुपये आणि आवक पाच क्विंटल होती. बाजारात केळीची आवक ५५ क्विंटल आणि दर ४५० ते ५५० रुपये क्विंटलचा होता. डाळिंबाचे दर २४०० ते ५००० रुपये क्विंटल आणि आवक ९६० होती. आंबा आवक १७५० क्विंटल आणि दर १४०० ते १६०० रुपये होते.

वाचा:  ‘सिद्धेश्वर’च्या निवडणुकीत ४६ अर्ज नामंजूर

बाजारातील बटाटा आवक ५५०० क्विंटल होती. कळमना बाजार समिती नागपूरसह लगतच्या मध्यप्रदेशातून देखील बटाटा आवक होते. त्यामुळे प्रचंड आवक सध्या बाजार समितीत होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. बटाट्याचे दर १००० ते १२०० रुपयांवर होते. बाजारात कांदा आवक देखील सरासरी २२५५ क्विंटल आहे. कांदा दर १५०० ते २००० रुपये होते. वाळलेल्या मिरचीची दोन हजार क्विंटलची आवक असून दर सहा हजार ते अकरा हजार रुपये होते.

वाचा:  फक्त १ रूपयात मिळणार घर; योगी सरकारची मोठी योजना

हिरव्या मिरचीचे व्यवहार २५०० ते ३००० रुपये क्विंटलने झाले. ढोबळी मिरची २५०० ते २६०० रुपये क्विंटल होती. बाजारात कारलीची देखील नियमित आवक असून दर ३००० ते ३२०० रुपये होते. मेथीचे दर २५०० ते २६०० रुपये आणि आवक ४० क्विंटल होती. मका कणीस देखील बाजारात दाखल होत असून त्याची आवक २०० क्विंटलच्या घरात आहे. दर दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलचे होते.

मोसंबीची नियमित आवक
कळमना बाजार समितीत सद्यःस्थितीत मोसंबीची सरासरी ३०० क्विंटल आवक होत आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या फळांना ३८०० ते ४३०० रुपये क्विंटल असा दर होता. या आठवड्यात देखील मोसंबीचे दर स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App