सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक टप्पा

Smiley face < 1 min

अकोला/लातूर : गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर मिळत असून मंगळवारी (ता.२७) ऐतिहासिक १० हजाराच टप्पा गाठला. वाशीम बाजार समितीत १०० क्विंटल सोयाबीनला १० हजार रुपये, तर लातूर बाजार समितीत ९ हजार ८५१ रुपये कमाल दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेंडीची मागणी, वायदे बाजारात होणारे व्यवहार, त्यात कमी असलेली आवक यामुळे सोयाबीन तेजीत आहे.

वाशीम बाजार समितीत गेल्या काही महिन्यांत सोयाबीन सात हजारांवर विकली जात आहे. आता हा दर पुन्हा वाढून दहा हजारांपर्यंत पोचला. सोयाबीनला किमान दर ८ हजारांपासून दर मिळाला. दर्जेदार सोयाबीनची यंदा बियाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी खरेदी केली होती. मंगळवारी सुमारे १४०० क्विंटलची आवक झाली होती. पहिल्यांदाच दहा हजारांचा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. शेतकऱ्यांकडील बहुतांश सोयाबीन विक्री झालेले आहे. सध्या आवक होत असलेला माल हा साठवून ठेवलेल्यापैकी असल्याचे सांगितले जाते.

egram
वाचा:  राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार

लातूर शहरातील तेल उत्पादक कंपन्यांनी दहा हजार रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली आहे. येथील आडत बाजारात आक्टोबरमध्ये सोयाबीनला कमाल भाव चार हजार १९० रुपये राहिला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्यात त्यात सातत्याने वाढ होत गेली. फेब्रुवारीमध्ये पाच हजाराचा टप्पा पार झाला.

मार्चमध्ये सहा हजारापर्यंत सोयाबीन गेले. एप्रिलपासून सोयाबीनच्या भावात कधीच मंदी आली नाही. साडे सात हजार, आठ हजार असे भाव वाढत गेला. २३ जुलै रोजी सौद्यात आठ हजार ९५१ रुपये कमाल भाव राहिला आहे. सरासरी भाव नऊ हजार सातशे रुपये राहिला आहे. तर शहरात तेल उत्पादक कंपन्यांनी दहा हजार रुपये प्रति क्विंटलला भाव दिला आहे.

वाचा:  चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची जबरी प्रतिक्रिया, म्हणाले...

“वाशीम बाजार समितीत सोयाबीन १० हजार रुपये दराने विक्री झाली. जेएस ३३५ या वाणाला हा भाव मिळाला. एकूण आवकेपैकी किमान १०० पोत्याला दहा हजारांचा भाव मिळावा असावा.”
वामनराव सोळंके, निरीक्षक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशीम

वाचा:  खाद्यतेल आयात शुल्कात कपात

आकडे बोलतात…
लातूर बाजार समितीतील कमाल दर (रुपये/क्विंटल)
महिना-           कमाल दर
ऑक्टोबर २०२०-      ४१९०
नोव्होंबर २०२०-      ४२३१
डिसेंबर २०२०-       ४३७५
जानेवारी २०२१-      ४५९१
फेब्रुवारी २०२१-      ५११३

मार्च २०२१-         ५८०५
एप्रिल २०२१-        ७६५२
मे २०२१-           ७६४१
जून २०२१-          ७६४१
जुलै २०२१-          ९८५१

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App