जीवनावश्यक वस्तू, किराणा दुकाने याबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा

ई ग्राम : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असून किराणा , औषधे , जीवनावश्यक गोष्टी याबाबत मोठी घोषणा केली असून या गोष्टी आता २४ तास उपलब्ध असणार आहेत . लॉकडाऊनमध्ये या गोष्टी ठरावीक वेळेतच भेटत होत्या. किराणा आणि होलसेल दुकाने सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ३ ते ५ याच वेळात भेटत होती यामध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात अला असून या गोष्टी २४ तास भेटणार आहेत.

सर्व पाहुयात या मध्ये कोतकोणत्या गोष्टीना समाविष्ट करण्यात आले आहे ते: सर्व जीवनावश्यक वस्तूची दुकाने , किरना दुकाने, औषंदाची दुकाने. इत्यादी

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने तसेच औषध दुकाने २४ तास खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Previous

उज्वला योजनेअंतर्गत ३ महिने मोफत गॅस सिलेंडर मिळणार

Read Next

या पार्टी ने दिले सर्व आमदारांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी !