पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले राज्य सरकार; घेतला मोठा निर्णय

Smiley face < 1 min

मुंबई  : नागपूर विभागात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.४) मान्यता दिली.

या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत व मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

वाचा:  मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक; कुठे काळे झेंडे, तर कुठे टायर जाळपोळ

पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची घरे पाण्यात बुडाली होती, घरांचे, घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते. काही ठिकाणी झोपड्याही नष्ट झाल्या होत्या.

या जाहीर झालेल्या निधीमधून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना सहाय्य व जखमी व्यक्तींना मदत देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे घरे पूर्णतः वाहून गेली असल्यास किंवा त्याचे नुकसान झालेले असल्यास त्यासाठी ८ कोटी ८६ लाख २५ हजार देण्यात येणार आहेत.

वाचा:  कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांचीही सावध चाल; कांदा आवक निम्म्याने घटली

दरम्यान, अंशतः पडझड झालेली कच्ची, पक्की घरे तसेच नष्ट झालेल्या झोपड्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी ७ कोटी १५ लाख रुपये मिळणार आहे.  मदत छावण्या चालवण्यासाठी ४७ लाख रुपये असा एकूण असा एकूण १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला जाणार आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App