“राज्यातील स्थानिक डेअरी व्यवसाय देशात दुसऱ्या स्थानावर”

Smiley face < 1 min

पुणे : राज्याचा स्थानिक डेअरी व्यवसाय भक्कमपणे वाढत असून देशात दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्यामुळे परराज्यातील डेअरींचे आक्रमण असल्याचा हाकाटी पिटून उगाच स्थानिक डेअरी उद्योगाला कमी लेखण्याचा प्रकार आपण बंद करायला हवा, असे मत सोनाई डेअरीचे अध्यक्ष दशरथ माने यांनी व्यक्त केले.

परराज्यातील डेअरी प्रकल्पांमुळे स्थानिक दूध धंदा धोक्यात आल्याची टूम कोणी काढली हेच कळत नाही. मुळात आपल्या राज्यातील डेअरीचालक हैद्राबादपासून अहमदाबाद, दिल्ली, जम्मूपर्यंत महाराष्ट्राचे दूध विकत असताना आपल्या दुधावर परक्याने आक्रमण केले असे म्हणणे चुकीचे आहे. अमुल, नंदिनी हे ब्रॅंड त्यांच्या राज्यातील अनुदानामुळे स्पर्धा करतात हे खरे आहे. मात्र, परराज्यातील दूध प्रकल्प पैसे मात्र महाराष्ट्राच्याच शेतकऱ्यांना देत आहेत, असे माने म्हणाले.

वाचा:  विमा, पतपुरवठा व्यवस्थांना करारशेतीशी जोडले; नवे धोरण स्विकारण्याचा केंद्राचा आग्रह

सोनाई, चितळे, राजहंस, गोकुळ, पराग, प्रभात, डायनामिक्स, वारणा हे ब्रॅंड महाराष्ट्राचे असून चांगली घौडदौड करीत आहेत. सहा लाख लिटरची क्षमता असलेला चीज प्रकल्प सोनाईकडे आहे. गेल्या हंगामात देशातून २७ हजार टन बटर निर्यात झाले. त्यात महाराष्ट्राचा वाटा आठ हजार टनाचा आहे. ५० हजार टन दूध पावडर निर्यात झाली असता त्यात पुन्हा महाराष्ट्राचा वाटा दहा हजार टनाचा आहे. मग आपण दुबळे कसे म्हणायचे, असा सवालही माने यांनी उपस्थित केला.

वाचा:  राजस्थानमध्ये सरकार अडचणीत, मदतीला या; राहुल गांधींचा महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याला निरोप

दुधधंद्यावर संकट एकटया महाराष्ट्रावर नसून जगभर आहे. त्यातून कोणीही सुटलेले नाही. मात्र, महाराष्ट्रातील डेअरीचालक, शेतकरी लढत आहेत. त्यामुळे उगाच परराज्यातील प्रकल्पांचा बागुलबुवा दाखवून स्थानिक दूध उद्योग संकटात असल्याची आवई ठोकली जात असल्यास तो महाराष्ट्राच्या क्षमतेचा अपमान आहे.

केंद्र सरकारमध्ये शरद पवार यांनी मंत्रिपदी असताना दुध धंद्यांला सतत मार्गदर्शन मदत केली. त्यामुळेच हे चांगले दिवस महाराष्ट्राच्या वाटयाला आले असून सध्या रोज ४० कोटीचे वाटप शेतकऱ्यांना केले जात आहे.

वाचा:  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानावर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड

दरम्यान, राज्यात कितीही परराज्यातील ब्रॅंड आले तरी सोनाईसारख्या डेअरीला २०० टनाचा पावडर प्लॅंट उभारण्याची संधी मिळते आहे. याचा अर्थ दूध धंदा वाढत असून यात परका आणि स्थानिक असा मुद्दा उपस्थित करणेच चूक आहे, असेही यावेळी माने म्हणाले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App