राज्याच्या ‘या’ भागात उन्हाचा चटका वाढणार; हवामान खात्याची माहिती

Smiley face < 1 min

पुणे : विदर्भाच्या अनेक भागात उन्हाच्या झळा कमी अधिक आहेत. यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे. येत्या रविवार (दि.४) पासून विदर्भाच्या काही भागात पुन्हा उष्णतेची लाट येणार आहे. आज गुरूवारी (दि.१) चंद्रपूर येथे उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

गेल्या दोन ते तीन दिवस विदर्भातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्हयात काही प्रमाणात उष्णतेची लाट आली होती. यामुळे या भागात कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढून तो जवळपास ४४ अंश सेल्सिअसपर्यत गेला होता. यामुळे अनेक भागात सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत होता. दुपारी कमालीचे तापमान वाढून पारा वेगाने वाढत होता. हे तापमान जवळपास सायंकाळपर्यत राहत असल्याने उन्हाच्या चांगल्याच चटका जाणवत होता.

वाचा:  ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस; पूरस्थिती निर्माण, अनेक गावांचा संपर्क तुटला

उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातील जवळपास सर्वच भागातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर सरकले आहे. मराठवाड्यातही परभणी, नांदेड मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, जळगाव, मालेगाव या भागातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्यावर गेले होते.

विदर्भाच्या उष्णतेचा लाटेचा परिणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही काहिसा झाला होता. आता लाट काहि प्रमाणात ओसरल्याने पारा किंचित कमी झाला आहे. कोकणात कमाल तापमानाचा ३२ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान कमी अधिक आहे.

वाचा:  मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट, कारण...

दरम्यान, मालेगाव, सांगली, सोलापूर या ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. इतर भागात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. मराठवाड्यातही ऊन असल्याने कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आहे. विदर्भातही कमाल तापमानाचा पारा चढलेलाच आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App