आदिवासी मत्स्य संस्थांना होणार जाळे पुरवठा

Smiley face < 1 min

ई -ग्राम, बुलडाणा : अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत विशेष केंद्रीय साह्य योजनेनुसार आदिवासी मत्स्य संस्थांना मत्स्य जाळे पुरवठा करण्यासाठी योजना राबवली जात आहे. त्याअनुषंगाने वैयक्तिक स्वरूपात नदया, नाले, तलावात मासेमारी करून आपली उपजीविका चालविण्याऱ्या तसेच मत्स्य संस्थेचे सभासद असणाऱ्यांना जाळे दिले जाणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी ११ मार्चपर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जासोबत आधार कार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, वैयक्तीक स्वरूपात छोट्या नद्या, नाले, तलावात मासेमारी करून आपली उपजीविका चालवीत असल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, मत्स्य संस्थेचे सभासद असल्याबाबत संस्थेचे पत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडावे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App