मारहाणीचे समर्थन म्हणजे बेशरमपणाचा कळस; भातखळकरांचा राऊतांवर निशाणा

Smiley face < 1 min

मुंबई  : निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी मारहाण केली. या केलेल्या मारहाणीचे  शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेले समर्थन हा निर्लज्जपणाचा आणि बेशरमपणाचा कळस आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

अभिव्यक्ती  स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाल्यावर संयमाचा बांध तुटतो, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात संजय राऊत यांनी (दि.१२ सप्टेंबर) व्यक्त केली होती. त्याबाबत भातखळकर यांनी आज समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित करून राऊत यांना प्रत्युत्तर दिले.

वाचा:  पुन्हा एक मराठा लाख मराठा; आंदोलनाला सुरूवात

यावेळी भातखळ म्हणाले की, निवृत नौदल अधिकारी शर्मा यांना झालेल्या मारहाणीचे राऊत यांनी केलेले समर्थन बेशरमपणाचा कळस आहे. स्वतः राऊत यांनी यापूर्वी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्यावर घाणेरड्या भाषेत टीका केली आहे. ‘सामना’ मध्ये विविध व्यक्तींवर आणि मान्यवरांवर अशीच टीका होत असते. आता मात्र इतरांनी आपल्या व्यक्तींवर टीका केल्यावर त्यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन करायचे, हा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता चांगलीच ओळखून आहे, असंही ते म्हणाले.

वाचा:  बाप रे! सात महिन्यात ३७६ शेतकऱ्यांना सर्पदंश

या मारहाणीमुळे शिवसेनेने राज्यात गुंडाराज तर आणलेच आहे. तसेच शिवसेनेत आणि शिवसैनिकांमध्ये सत्तेचा माज डोक्‍यात गेल्याचे हे लक्षण आहे.  मात्र महाराष्ट्राची जनता विचारी असून हा माज उतरल्याशिवाय ती राहणार नाही.

वाचा:  मराठवाड्यात पावसाचे धुमशान; ‘या’ पिकांचे मोठे नुकसान

दरम्यान, निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी शिवसैनिकांवर जोपर्यंत अजामीनपात्र गुन्हे नोंदवले जात नाहीत. तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, हे राऊत यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App