अंगणवाडी सेविकांवर टांगती तलवार; दोन लाख कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी

Smiley face < 1 min

नाशिक – केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विभागाने जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात ५-३-३-४ हा फॉर्म्युला अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर सन २०२२ पासून हे नवीन धोरण देशभरात लागू होईल. परंतु या धोरणात पहिल्या पाच वर्षांमधील पहिले तीन वर्षे खेळ, मनोरंजनाबरोबरच विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात गोडी लागावी यासाठी राहणार असल्याने जुन्या शैक्षणिक फॉर्म्युल्यानुसार विचार करता अंगणवाडी अभ्यासक्रमाचा यात समावेश करण्यात आला आहे.

परंतु यामुळे अंगणवाडी सेविकांबरोबरच त्यांना मदत करणाऱ्या सेविकांना नव्या शैक्षणिक धोरणात सामावून घेतले जाणार की नाही याबाबत पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे राज्यभरातील २ लाखांहून अधिक सेविका व मदतनिसांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार राहणार आहे.

वाचा:  ठाकरे सरकार सप्टेंबरपर्यंत कोसळणार; नारायण राणे यांचा दावा

पूर्वीचा फॉर्म्युला
गेल्या ३४ वर्षांपासून देशभरात १० + २ हा शैक्षणिक फॉर्म्युला चालत आला आहे. परंतु विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कला, कौशल्य व रोजगाराचे देखील शिक्षण मिळाले पाहिजे व देशाच्या विकास दराशी शिक्षणाचा संबंध जोडण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले होते. नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करताना ५ + ३+ ३ + ४ असा फॉर्म्युला निश्‍चित करण्यात आला आहे.

वाचा:  दूध दर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; किसान सभेची मागणी

हे मुख्य ध्येय
नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिल्या पाच वर्षांतील पहिली तीन वर्षे पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्याबरोबरच खेळ, मनोरंजन व कला गुण विकसित करण्यासाठी राहणार आहे. जुन्या शैक्षणिक धोरणात पहिले ते पाचवी असा प्राथमिक शिक्षणाचा टप्पा होता. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून बालवाडी संकल्पना पुढे आली. पुढे शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक कमकुवत गटासाठी अंगणवाडी संकल्पना अमलात आणली गेली.

वाचा:  खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार स्वस्त कर्ज

यांचा विचार नाही
नव्या शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश पहिल्या पाच वर्षात करण्यात आल्याने बालवाडी किंवा अंगणवाडी संकल्पना संपुष्टात येणार आहेत. राज्यभरात एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत व शहरी भागात महापालिकांच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनिसांचा विचार अद्यापपर्यंत झालेला नाही.

राज्यातील अंगणवाड्या – ९७ हजार २६०
मिनीअंगणवाड्या – ११ हजार ०८४
सेविका व मदतनीस – २ लाख
पर्यवेक्षक – ४ हजार

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App