कांद्याच्या साठवणूकीसाठी स्मार्ट सोल्यूशन; टाटा स्टीलचं तंत्रज्ञान

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि सातारा हे जिल्हे कांद्याच्या लागवडीसाठी प्रसिध्द आहेत. राज्यात अंदाजे १ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. पण बऱ्याचदा कांद्याचे चांगले उत्पादन झाले तरी शेतकऱ्यांकडे कांदा साठवणूकीसाठी योग्य यंत्रणा नसल्याने कांदा सडण्याच्या भीतीने शतकऱ्यांना तो मिळेल त्या दराला विकावा लागतो. परंतू आता टाटा स्टील कंपनीच्या मॉड्यूलर कंस्ट्रक्शन सोल्यूशन्स ब्रांड नेस्ट इनने देशातील पहिले कांदा साठवणूकीसाठी सोल्यूशन अॅग्रोनेस्ट आणले आहे.

या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा व्यवस्थितरित्या साठवता येणार आहे. कांद्याच्या साठवणूकीसाठी तयार केलेले हे पहिले स्मार्ट वेअरहाऊस आहे. अद्यावत संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कांदा साठवणूकीसाठीची कमतरता, निकृष्ठ आराखड्यासाठी वापरलेल्या साहित्यामुळे शेतकऱ्यांचा जवळपास ४० टक्के कांदा गोदामातच खराब होतो.

हवामानातील बदल तसेच कांदा वाहतूक करताना येणाऱ्या अडचणी यामुळे शेतकऱ्यांना आपला माल सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक अडचणी येतात. कांदा साठवणूकीसाठी शेतकऱ्यांसाठी योग्य सोय नसते. शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेवून टाटा स्टीलच्या नेस्ट इन आणि इनोव्हेट टीमने एक स्मार्ट वेअरहाऊस विकसीत केले आहेत. याच्या रचनेमुळे हवा नियंत्रीत ठेवता येते. हवा नियंत्रीत राहिल्यामुळे कांदा अधिक काळासाठी सुरक्षित ठेवता येतो.

या वेअरहाऊसमध्ये खुप कमी प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होते. या वेअरहाऊसमधील तापमान नियंत्रीत ठेवण्यासाठी तापमान, ओलावा
आणि गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेंसर लावण्यात आले आहेत. ज्यामुळे आपल्याला कांदा खराब होण्यापूर्वीच सुचित करते. टाटा स्टीलचे प्रमुख (सर्व्हीसेस आणि सोल्यूशन्स) पी. आनंद म्हणाले की, भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता आणणे गरजेचे आहे. या गोष्टीने प्रेरित होवूनच आमची एक्सपर्ट अॅग्रीकल्चर क्षेत्रासाठी कस्टमाईज्ड सोल्यूशन्स विकसीत केले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App